मुख्य सामग्रीवर वगळा
निस्त्या ची आंबट गोड चटणी...
ही चटणी तुम्ही कशा बरोबर ही खाऊ शकतात,. ब्रेड , डोसा,
कटलेट, पोळी, समोसा चाट कशा बरोबर ही. खाता येते
तसेच. ही. चटणी मेथीची भाकरी आणि कळण्याच्या भाकरीबरोबर जास्त करून खातात खूप छान लागते तुम्ही नक्की करून पहा...
साहित्य.:-
१. एक मध्यम आकाराचा कांदा
२. रंगाची मिरची ३ ते. ४
३. तिखट मिरची. ३. ते. ४. ( सुकी लाल मिरची घ्यावी )
४. लसूण पाकळ्या. ४. ते ५
५. थोडीशी चिंच
६. थोडासा गुळ
७. मीठ
८. पाणी
९ तेल
कृती.:-
- प्रथम कांदा कापून घ्यावा. गॅसवर तवा तापत ठेवून त्यावर सुकी लाल मिरची रंगाचे आणि तिखटाची दोन्ही मिरच्या प्रथम भाजून घ्याव्यात या करपून द्यायच्या नाहीत
- त्यानंतर कांदा तव्यावर टाकावा किंचित सतेल पण टाकावं कांदा लालसर भाजून घ्यावा. गॅस बंद करावा चिंच गुळ एका छोट्या वाटीत भिजत ठेवावे,
- मिक्सरमध्ये भाजलेल्या सुक्या मिरच्या टाकाव्यात त्यात लसुन मीठ कांदा हे सर्व टाकून मिक्सर मध्ये वाटून घ्यावे, चिंचेतील बिया काढून टाकाव्यात. चिंचगुळाचे पाणी तयार होईल ते मिक्सर मध्ये टाकून त्यात थोडे मीठ टाकून चटणी चांगली बारीक वाटून घ्यावी,
- चटणी वाटून झाले की एका बाऊलमध्ये काढून घ्यावे,
- आपल्याला जेवढी पातळ पाहिजे तेवढेच पाणी टाकावे (जास्त पातळ करू नये) ही चटणी थोडी घट्टसरच चांगली लागते अशा रीतीने आपले आंबट गोड चटणी म्हणजेच नुसत्या ची चटणी खाण्यासाठी तयार आहे,
गरम मेथीच्या भाकरीवर ही चटणी खुपच छान लागते आणि हे फ्रिजमध्ये पाच-सहा दिवस. चांगली राहते, प्रवासात न्यायला सुद्धा तुम्हाला उपयोगी पडेल कार्यकर्ते लवकर खराब होत नाही तुम्ही नक्की करून बघा ही चटणी!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा